सातारा : ‘स्‍थायी’मधील २०० विषय अधांतरीच

तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष; विविध विकासकामांसाठीच्‍या निधींबाबतही अनेक नगरसेवकांमध्ये साशंकता
satara muncipality
satara muncipalitysakal media
Updated on

सातारा : पालिकेच्‍या(satara carporation) नुकत्‍याच झालेल्‍या स्‍थायी समितीच्‍या सभेपुढे मांडण्‍यात आलेले २०० हून अधिक विषय तांत्रिक बाबींअभावी अपूर्ण-अधांतरी असल्‍याचे समोर येत आहेत. कागदपत्र,(documents) टिपण्‍यांशिवाय अधांतरी असणाऱ्या या विषयांचे प्रशासकीय, राजकीय, निधीविषयक भविष्‍य काय आणि कसे असणार? याबाबत अनेक नगरसेवक(carporators) सांशकता व्‍यक्‍त करत आहेत. गत निवडणुकीत नगर विकास आघाडीला रोखत सातारा विकास आघाडीने सातारा पालिकेची सत्ता आपल्‍या हाती घेतली. सत्ता ताब्‍यात घेतल्‍यानंतर बहुमताच्‍या जोरावर ‘साविआ’ने शहरातील विकासकामांना चालना देण्‍याचा प्रयत्‍न केला. प्रशासकीय-राजकीय बाबींवर कामकाज रेटत आणि तांत्रिक-अतांत्रिकतेच्‍या मुद्यांना बगल देत ‘साविआ’चा हा विकासरथ गेली पाच वर्षे पालिकेत रडतखडत सुरूच राहिला. सातारा पालिकेच्‍या कार्यकारिणीचा कार्यकाळ नुकताच संपला असून, सध्‍या त्‍याठिकाणी प्रशासकीय राजवट लागू झाली आहे.

satara muncipality
हरिहरेश्‍वर बॅंक घोटाळ्याचा तपास ईडीकडे सोपवा : खातेदार कृती समिती

कोरोना, लॉकडाउन व इतर तांत्रिक बाबींमुळे सर्वच शासकीय, प्रशासकीय यंत्रणांच्‍या कामांवर मर्यादा येऊन पडल्‍या होत्‍या. या मर्यादांमुळे पालिकेचा बहुतांश कारभार तसेच काही सर्वसाधारण सभांचे कामकाज ऑनलाइन पध्‍दतीने पार पडले. मुदत संपत असल्‍यामुळे निवडणुकीत मतांची बेगमी करण्‍यासाठीची रणनीती ‘साविआ’ने रचली होती. याच काळात ‘नविआ’च्‍या सदस्‍यांनी सर्वसाधारण सभेचे पालिका प्रशासनास आयोजन करण्‍याचे आदेश देण्‍याची मागणी जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे केली. ‘नविआ’ सर्वसाधारण सभेच्‍या मागणीवर आक्रमक होत असतानाच ‘साविआ’ने सर्वसाधारण सभेऐवजी स्‍थायी समितीची सभा आयोजित करत निवडणुकीच्‍या तोंडावर प्रलंबित कामांच्‍या दारुगोळ्याला विकासाची बत्ती लावली.

satara muncipality
सातारा : भरमसाट वीजबिले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; मनसे आक्रमक

कार्यकाळ संपण्‍यासाठी दहा-बारा दिवस बाकी असतानाच ‘साविआ’ने पालिकेच्‍या स्‍थायी समितीची बैठक आयोजित करत त्‍यापुढे ४०० विषयांचा जम्‍बो अजेंडा मंजुरीसाठी ठेवला. समितीच्‍या सभेवेळी असणाऱ्या बहुमताच्‍या जोरावर या विषयांना मंजुरी देत ‘साविआ’ने बाजी मारली. सभेचे सोपस्‍कार पार पडल्‍यानंतर स्‍थायी समोरील विषय पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठविण्‍यात आले. स्‍थायीच्‍या सभेत मंजूर झालेल्‍या विषयांची लिखापढी होत असतानाच प्रशासनाला ४०० पैकी २०० हून अधिक विषय तांत्रिक बाबींवर अपूर्ण असल्‍याचे दिसून आले. सभेच्‍या तोंडावर पत्रिकेत घातलेले विषय पालिका प्रशासनाच्‍या सर्वच विभागांच्‍या पातळीवर अपूर्ण असल्‍याने त्‍यावरील पुढील कार्यवाही सध्‍यातरी रखडल्‍याचे दिसून येत आहे.विषय अपूर्ण असल्‍याने त्‍यांचे भविष्‍य यापुढील काळात प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर कितपत टिकते, याबाबत पालिका प्रशासनासह अनेक नगरसेवक साशंकता व्‍यक्‍त करत आहेत.

satara muncipality
सातारा नगरपालिकेच्‍या प्रशासकपदी अभिजित बापट

बहुमताच्‍या जोरावर विषयांची रेटारेटी

स्‍थायी समितीच्‍या सभेपुढे मांडण्‍यात आलेले निम्‍मे विषय अपूर्ण असून, त्‍यांना कोणतेही भवितव्‍य नाही. सभेदरम्‍यान ज्‍येष्‍ठ नगरसेवक अशोक मोने त्‍यांनी त्‍यास हरकत घेतली होती. मात्र, उपस्‍थितांनी बहुमताच्‍या जोरावर स्‍थायी समितीच्‍या सभेचे कामकाज पुढे रेटले. निवडणुकीच्‍या तोंडावर सत्तेच्‍या जोरावर ‘साविआ’ने विकासकामांत सातारकरांची दिशाभूल केली आहे, असे मत नगर विकास आघाडीचे नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Milk Adulteration Suspected After Panic Disposal Following FDA Raid Rumour
FDA raid rumour in Satara
Koyna Dam water level today
Who is Prachi Devkar?
Marathi News Esakal
www.esakal.com