Satara News:'सातारा जिल्ह्यात बालमृत्यू दरात घट'; गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्के प्रमाण कमी, आरोग्य यंत्रणांच्‍या प्रयत्नांना यश

Healthcare Success: आरोग्य कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या मोहिमा, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या सक्रिय सहभागामुळे सकारात्मक बदल झाला आहे. गेल्या वर्षी (२०२३-२४) मध्ये जिल्ह्याचा बालमृत्यू दर ११ टक्के होता. तो २०२४- २५ मध्ये तीन टक्‍क्‍यांनी कमी होऊन आठ टक्क्यांवर आला आहे.
Maternal Mortality Rate
Maternal Mortality Rateesakal
Updated on

-प्रशांत घाडगे

सातारा: आईच्या कुशीत लहानग्याचा श्‍वास सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या उपाय योजनांना यश येत असल्‍याचे दिसत आहे. नवजात किंवा वर्षाच्या आतील बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी जाणीवपूर्वक झालेल्‍या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील बालमृत्यू व अर्भक मृत्यूदराचे प्रमाण घटून नवजीवनाला दिलासा मिळाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या मोहिमा, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या सक्रिय सहभागामुळे सकारात्मक बदल झाला आहे. गेल्या वर्षी (२०२३-२४) मध्ये जिल्ह्याचा बालमृत्यू दर ११ टक्के होता. तो २०२४- २५ मध्ये तीन टक्‍क्‍यांनी कमी होऊन आठ टक्क्यांवर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com