बकरी ईद : प्रांताधिकाऱ्यांच्या आवाहनास मुस्लिम समाजाचे पाठबळ

आयाज मुल्ला
गुरुवार, 30 जुलै 2020

ईदनिमित्त सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित नगरपंचायत, पोलिस स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वडूज (जि.सातारा) : कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव असल्याने शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून बकरी ईद साजरी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले आहे. येथील तहसील कार्यालयात मुस्लिम समाज आणि प्रशासन यांची बैठक झाली. या वेळी त्या बोलत होत्या. 

याप्रसंगी तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रांताधिकारी जिरंगे म्हणाल्या, ""कोविड 19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यात धार्मिक कार्यक्रमाला बंदी असून, खटाव तालुका व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईदची नमाज मशिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नमाज पठण हे आपल्या घरीच अदा करावे. सध्या जनावरांचे बाजार बंद असल्याने नागरिकांनी फोनवरून अथवा ऑनलाइन पद्धतीने जनावरे खरेदी- विक्री करावी. शक्‍यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रात सध्या लागू असलेले नियम निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्ताने कोणतीही शिथिलता करता येणार नाही.''

साताऱ्याचे जिल्हाधिकारी बनले कठाेर, अखेर 'हा" निर्णय घेतलाच

या तालुक्‍यात पावसाची उघडीप; शेतकऱ्यांपुढे चिंतेचे ढग 

येथे सापडला अर्धा किलोचा दुर्मिळ प्रजातीचा झिंगा

ईदनिमित्त सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित नगरपंचायत, पोलिस स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. या वेळी वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडूज, हिंगणे, अंबवडे, निमसोड, मायणी, चितळी, पचवड, बनपुरी, विखळे आदी कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी सूचनाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस उपस्थित असलेल्या मुस्लिम समाज बांधवांनी प्रांताधिकारी यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला.

Edited By : संजय शिंदे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Administration Appeals Celebreate Bakri Eid In Simple Manner