या शहरात वाढली भिती : आणखी एक महिला डॉक्‍टर बाधित

कोरोना
कोरोना

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाबाधित ठरलेल्या महिला डॉक्‍टर कऱ्हाड शहरानजिक कार्वेनाका येथे राहतात. त्या संबंधित डॉक्‍टर सांगलीला मेडिकल कॉलेजमध्ये गेल्या होत्या. तेथून आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या पतीसह अन्य चार नातेवाइकांना क्वारंटाइन केले आहे. त्या सांगलीलाच कोरोनाबाधित झाल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या घरासह परिसरही सील केला आहे.

येथील सोमवार पेठेतील मुंबईस्थित व्यक्‍ती मात्र आठ दिवसापूर्वी आल्यावर घरी न जाता थेट फार्मसी कॉलेजमध्येच क्वारंटाइन झाली होती. तेथे त्यांचा स्वॅब घेतल्यावर काल रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. येथे त्यांची पत्नी व मुले आहेत. त्यांची तपासणी झाली आहे. मात्र संबंधित व्यक्ती घरी आलीच नसल्याने घर किंवा परिसर प्रशासनाने सील केलेला नाही. 

मार्केट यार्डसमोरील व्यक्ती काही दिवसांपूर्वी बाधित ठरली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या घरातील पाच लोक बाधित ठरले. त्याच दिवशी रुक्‍मिणी विहार परिसरातील ठाण्याहून आलेली एक व्यक्ती बाधित ठरली होती. त्यामुळे एकाच दिवशी सहा लोक बाधित ठरले आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांना क्वारंटाइन केले आहे. दोन दिवसांपूर्वी पार्लेतील विलगीकरण कक्षातील महिला डॉक्‍टर बाधित ठरल्यानंतर काल कार्वे नाका परिसरातील आणखी एक महिला डॉक्‍टर बाधित ठरली. त्यासोबत सोमवार पेठेतील एक व्यक्ती बाधित आढळल्याने कऱ्हाड शहरातील बाधितांची संख्या नऊवर गेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com