esakal | Satara: कलाकारांच्या मागणीसाठी प्रशासनाच्या दारात जागरण
sakal

बोलून बातमी शोधा

कलाकारांच्या मागणीसाठी प्रशासनाच्या दारात जागरण

सातारा : कलाकारांच्या मागणीसाठी प्रशासनाच्या दारात जागरण

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज : ओबीसी आरक्षण, बाजारबंदी उठवावी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देऊन विविध प्रकारच्या कलाकारांची आयुष्याची होत असलेली फरफट थांबवावी या मागणीसाठी खटाव तालुक्यातील कलाकारांनी थेट प्रशासनाच्या दारातच सुरसनई व शिंग तुतारीच्या निनादाबरोबरच जागरण,गोंधळ, गणगवळण सादर करीत हलगीचा कडकडाट केला.

खटाव तालुका सोशल फाऊंडेशनच्यावतीने या सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, डॉ. महेश गुरव, नाना पुजारी, प्रा. कविता म्हेत्रे, धनंजय क्षीरसागर, विजय शिंदे, डॉ. वैभव माने, प्रदिप शेटे, हरीदास जगदाळे, राजेंद्र खाडे, अजित नलवडे, गणेश भोसले, भरत लोकरे, उद्योजक जीवनशेठ पुकळे, अमिन आगा, डॉ. महेश माने, राजेंद्र फडतरे, परेश जाधव, अंकुशराव दबडे, विजय शिंदे, राजेंद्र लोखंडे, पांडूरंग झगडे, बनाजी पाटोळे, गणपतराव खाडे पाटील, अमृत सुर्यवंशी, अजित साठे, शबाना मुल्ला, शारदा भस्मे, दिलशाद तांबोळी, राणी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: मुंबई : महिलांसाठी विशेष लसीकरण

शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसिलदार कार्यालयाबाहेर काही वेळ ठिय्या मांडत विठ्ठलस्वामी महाराज, श्री. पुजारी, डॉ. गुरव, प्रा. म्हेत्रे, डॉ. माने, श्री.नलवडे, धनाजी लवळे, महेश खडके, आदींनी ओबीसी आरक्षण, बाजारबंदी उठवावी या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी पडळकर तमाशा मंडळाचे मोहनराव वन्ने, दादा वन्ने व कलाकारांनी गणगवळण सादर केले. जयमल्हार जागरण पार्टीचे तानाजी दळवी व सहकलाकारांनी वाघ्या मुरळीची जागरण गीते सादर केली. मधुर बिटस्‌ ऑर्केस्ट्राचे चालक संतोष वायदंडे, माधुरी वायदंडे यांनी लावणी आदी गीते सादर केली. जायगाव, गोपूज, वडूज, नागाचे कुमठे, येथील गुरव समाजातील कलाकारांनी शिंग वादन, सातेवाडीतील कलाकारांनी सूरसनई वादन तर बंडू कांबळे यांनी तबला वादन केले.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे गेली दीड वर्षे हातावर पोट असणाऱ्या या कलाकारांच्या आयुष्याची फरफट होत आहे. शासनाने विविध निकष लावून कार्यक्रमांना परवानगी दिली आहे मात्र बँड वादक तसेच अन्य कलाकारांच्या कार्यक्रमांना परवानगी नसल्याने त्यांची कौटुंबिक व आर्थिक वाताहात होत आहे. त्यामुळे कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनासुध्दा परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा: माध्यमांसोबत वेळ घालवण्यापेक्षा तपास यंत्रणेला माहिती द्या: दरेकर

यावेळी प्रा. नागनाथ स्वामी, सोमनाथ काळे, उदय गुरव, किरण काळे, अरूण महामुनी, प्रा. अजय शेटे, नितीन रणदिवे, कृष्णराव बनसोडे, हरीदास बनसोडे, निलेश घार्गे देशमुख, लालासाहेब माने, धनाजी चव्हाण, ज्ञानेश्वर इंगवले, शरद कदम, संदिप दळवी, समीर तांबोळी, सुरज भांडवलकर, धनाजी जाधव, रविराज महामुनी, अमर फडतरे, किरण गोडसे, आकाश जाधव, बजरंग रोमन, वसंत पाटोळे, संतोष पाटोळे, सोमनाथ साठे, संगिता वन्ने, माधुरी वायदंडे, शोभा गुरव आदी उपस्थित होते. तहसिलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनामुळे विविध कलावंतांबरोबरच तमाशामध्ये काम करणाऱ्या कलावंतांचे मोठे हाल होत आहेत. हे कलाकार अन्य कुठे काम करू शकत नाहीत. आता असं बी मरायचं हाय अन् तसंबी मरायचं हाय. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा प्रत्येक तालुक्यातल्या तहसिलदार कार्यालयात तमाशा मंडळाने स्टेज घालून तमाशा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही यावेळी तमाशा कलावंतांनी सांगितले.

loading image
go to top