
सातारा (जि. सातारा) ः गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला भाजप सरकार कारणीभूत आहे. नरेंद्र मोदींची कुचकामी भूमिका आणि चीनपुढे नमत्या धोरणामुळे आपले लष्करी सामर्थ्य असूनही 20 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. या संकटप्रसंगी भारतीय जनता जवानांच्या पूर्णपणे पाठीशी आहे, असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी नमूद केले.
येथील हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमात भारत-चीन संघर्षात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी केंद्र सरकारच्या कारभाराचा निषेधही करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश विकासाचे व प्रगतीचे अनेक टप्पे पार करत गेला. या स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेसचे मोठं योगदान राहिले आहे, असे नमूद करून डॉ. जाधव यांनी भाजपच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. ते म्हणाले, ""संविधान हे भारतीय लोकशाहीच सर्वात मोठे यश व शक्तिस्थान आहे; परंतु, व्यक्तीकेंद्रित राजकारण आणि धरसोडीच्या परराष्ट्र धोरणामुळे भारतीय जवानांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होऊ लागले आहे. देशात अस्थिरतेच वातावरण तयार झाले आहे. सध्या गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला भाजप सरकार कारणीभूत आहे. पंतप्रधानांची कुचकामी भूमिका व चीनपुढे नमत्या धोरणामुळे लष्करी सामर्थ्य असूनही 20 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले.''
या वेळी प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, धनश्री महाडिक, नरेश देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बाबासाहेब कदम, प्रल्हाद चव्हाण, पतंगराव फाळके, मनोजकुमार तपासे, धैर्यशील सुपले, ऍड. धनावडे, बाळासाहेब शिरसाट, अमित जाधव, रजिया शेख, माधुरी जाधव, अमर करंजे, अनिल वाघमळे, मालन परळकर आदींसह कॉंग्रेसचे पदाधिकारी व विविध सेलचे प्रमुख उपस्थित होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश विकासाचे व प्रगतीचे अनेक टप्पे पार करत गेला. या स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेसचे मोठं योगदान राहिले आहे.- डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस समिती, सातारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.