
सातारा : बूस्टर डोस झाला ‘लॉकडाउन’
सातारा : मागील आठ ते दहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ९० टक्के नागरिकांचे दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्य:स्थितीत या नागरिकांची बूस्टर डोस घेण्याची मुदत आली असूनही जिल्ह्यात एकाही खासगी रुग्णालयात बूस्टर डोस उपलब्ध नाही. आरोग्य विभाग, सरकारी कर्मचारी व ६० वर्षांवरील व्यक्तींना सरकारी रुग्णालयात डोस मिळत आहे. परंतु, अन्य वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोससाठी परजिल्ह्यात जावे लागत असल्याचे चित्र दिसून येते.मार्च २०२० पासून जगभरात कोरोनाचे थैमान सुरू झाले.
खासगी रुग्णालयांमध्ये डोस उपलब्ध करा
गेल्या सहा महिन्यांपूर्वी खासगी रुग्णालयात बूस्टर डोस उपलब्ध होते. परंतु, रुग्णालयात डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने डोस माघारी पाठविल्याचे खासगी रुग्णालयांचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत कोरोनाची संख्या पाहता बूस्टर डोस मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांना बूस्टर डोस उपलब्ध करण्यासाठी सूचना देण्याची गरज आहे.
बूस्टर आता सहा महिन्यांवर
सुरुवातीला नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बूस्टर डोसची मुदत नऊ महिन्यांनंतर होती. मात्र, आता दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांत बूस्टर घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बूस्टर घेण्यासाठी नागरिकांची संख्या वाढणार आहे.
Web Title: Satara Booster Dose Becomes Lockdown
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..