Video पाहा : ठाकरे- मोदींच्या भेटीवर उदयनराजे म्हणतात...

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackreay) यांनी शिष्टमंडळासमवेत आज (मंगळवार) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते. खासदार उदयनराजे भाेसले यांना माध्यमांना गाठून या भेटीबाबतची प्रतिक्रिया विचारली असता उदयनराजेंनी या भेटीपुर्वी राज्य सरकारने अधिवेशन बाेलावले पाहिजे होते. राजकीय तडजोडीसाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असेही राजेंनी नमूद केले. (satara-breaking-news-udayanraje-bhosale-prime-minister-narendra-modi-chief-minister-uddhav-thackreay)

खासदार उदयनराजेंनी आज शासकीय विश्रामगृहात हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागांत सुविधात देता याव्यात यासाठी अधिकारी, लाेकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले शाहूपूरी, शाहूनगर, अंबेदरे, दरे, विलासपूर, पिरवाडी, विसावा नाका भाग हा सर्व भाग सातारा पालिकेची हद्द वाढीनंतर समाविष्ट झाला आहे. या भागातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी अधिकारी, त्या भागातील लाेकप्रतिनिधी, परिसरातील जाणकार नागरिकांसमवेत एक बैठक झाली. या बैठकीत त्या भागात जास्त जास्त मूलभूत सुविधा देण्यासाठीची चर्चा झाली.

Udayanraje Bhosale
हताश झालो, डगमगलो नाही; ऑलिंपिकला देशाचा झेंडा फडकविणारच!

पालिका निवडणुकीत जनतेला मी जाे वचननामा दिला हाेता. त्यातील 90 पेक्षा जास्त कामे झाली आहेत. जी कामे करायची राहिलेली आहेत ती लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी नियाेजन झाले आहे. आजच्या बैठकीनंतर हद्दवाढीत आलेल्या नागरिकांना सुविधा मिळतील अशी मला आशा आहे.

Udayanraje Bhosale
12.50 कोटी लोकांचे रोजगार गेले, 23 कोटी दारिद्य्ररेषेखाली; मोदी सरकार नेमकं काय करतंय?

त्या भागातील नागरिकांना असे वाटले नाही पाहिजे की पालिकेत आलाे आणि चूक झाली की काय. त्यामुळेच तिथे इतक काम करा की लाेक म्हणतील यापुर्वी पालिकेत समावेश झाला असता तर बरं झाले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com