वडूज मार्केटमध्ये वाघा घेवड्यास सहा हजार क्विंटल दर!

आयाज मुल्ला 
Monday, 21 September 2020

हिरव्या मुगाचीही चांगली आवक असून, मुगास सहा हजार 200 ते आठ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. चवळी व पिवळ्या मुगालाही चांगला दर मिळत आहे. 

वडूज (जि. सातारा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवड्याची चांगली आवक होत आहे. वरुण व वाघा घेवड्यास पाच हजार ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. 

येथील बाजार समितीमध्ये पाच प्रमुख व्यापारी घेवडा, मूग, उडीद, चवळी खरेदी करत आहेत. दररोज घेवड्याची चांगली आवक होत आहे. गेल्या 15 दिवसांत 200 हून अधिक ट्रक माल बाहेर गेला आहे. हिरव्या मुगाचीही चांगली आवक असून, मुगास सहा हजार 200 ते आठ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

चवळी व पिवळ्या मुगालाही चांगला दर मिळत असल्याने खटाव तालुक्‍याबरोबर माण तालुक्‍यातील खरीप शेतीमाल येथील बाजार समितीमध्ये येत आहे. व्यापारी काही शेतकऱ्यांना तत्काळ रोख तर काहींना बॅंक अकाउंटवर पेसे पाठवत आहेत. अशीच परिस्थिती पुसेसावळी येथील उपबाजाराचीही आहे. 

सभापती शशिकांत देशमुख, उपसभापती तुकाराम यादव आणि सहकाऱ्यांनी घेवडा खरेदी प्रक्रियेची नुकतीच समक्ष पाहणी केली. यावेळी संस्थेचे सचिव शरद सावंत, उपसचिव अशोक पवार, लेखाधिकारी हणमंत मदने, विजय गोडसे, श्री. सर्वगोड, व्यापारी सुहास राजमाने, रोहित राजमाने आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : पांडुरंग बर्गे

कोरोनाला हरवायचंय? मग नियमित आहारात असा करा लसूण आणि हळदीचा वापर  

 नेर प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढवण्यास मान्यता - 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Buying And Selling In Vaduj Market Boom