कुत्र्यास वाचवताना मुलाचा मृत्यू; गुराख्याने एकास वाचविले

Corona positive doctor dies during treatment
Corona positive doctor dies during treatment

तांबवे (जि. सातारा) : मुरुम उत्खनन झाल्याने पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाळीव कुत्रा पडला. त्याला वाचवण्यासाठी दोघे जण पाण्यात उतरले. ते दोघे बुडायला लागल्यावर काठावर उभ्या असलेल्या मित्राने आरडाओरडा केला. त्यादरम्यान तेथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एकाने धावत येत एका मुलाला बाहेर काढले. दुसऱ्यालाही काही वेळातच बाहेर काढले. मात्र, त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. मुज्जफ्फर समीर मुलाणी असे मृत्यू झालेल्या मुलाचे, तर आर्शद रफीक मुलाणी असे वाचलेल्या मुलाचे नाव आहे. (satara-child-died-while-saving-dog-sakurdi-marathi-news)

याबाबत माहिती अशी, साकुर्डी (sakurdi) येथील समीर मुलाणी यांचा मुलगा त्याच्या मित्रांबरोबर पाळीव कुत्र्याला घेऊन गावच्या उत्तरेला असणाऱ्या पीरसाहेब टेकडीकडे गेले. तेथील नवीन दफनभूमीच्या परिसरात मुरुमाचे उत्खनन झाल्याने तेथे खड्डा तयार झाला आहे. त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. त्या खड्ड्यातील पाण्यात कुत्रा पडला. त्याला वाचवण्यासाठी मुज्जफ्फर (वय १२) आणि आर्शद (वय १४) पाण्यात उतरले. दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्यात खोलवर जायला लागल्यावर त्यांनी आरडाओरडा केला.

Corona positive doctor dies during treatment
शरद पवारांच्या पुढाकारातून साताऱ्यात 100 बेडचे रुग्णालय

त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रानेही आरडाओरडा केला. त्यामुळे त्या परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याने तिकडे धाव घेत दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यादरम्यान इतरही लोक तेथे जमले. गुराख्याने आर्शदला बाहेर काढले. त्याचवेळी मुजफ्फर हा पाण्यात बुडाला. बाहेर काढल्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Corona positive doctor dies during treatment
आता ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण; साता-यात नियोजन सुरू

गुराख्यामुळे वाचले एकाचे प्राण

कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोन मुलांना बाहेर काढण्यासाठी गुराखी कृष्णत महादेव जाधव यांनी धावत येत त्यांना बाहेर काढले. त्यादरम्यान मुजफ्फरचा मृत्यू झाला. मात्र, आर्शदला जीवदान मिळाले. त्यामुळे गुराखी जाधव यांनी दाखवलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com