
सातारा: आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या ध्वनिवर्धक यंत्रणेला गणेशोत्सवासह इतर उत्सवाच्या काळात बंदी आणावी, या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी मुसळधार पावसात एकीचे बळ दाखवीत गोलबाग ते पोवई नाका असा मोर्चा काढत ध्वनिवर्धक यंत्रणा बंद करून दाखविणारच असा निर्धार केला. छत्रपतींच्या सातारा जिल्ह्यातून पहिल्यांदा ‘ध्वनिवर्धक यंत्रणा हद्दपार करा’, ‘नागरिकांचे आरोग्य सांभाळा’ अशा घोषणा देत ज्येष्ठांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चाच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.