सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी; जिल्हाधिकाऱ्यांनी बदलल्या दुकानांच्या वेऴा

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 9 जुलै 2020

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनच्या शिथिलतेत थोडा बदल केला आहे.

सातारा : विनाकारण घराबाहेर पडून नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागल्याने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे सर्व मार्केट व दुकाने आता सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू राहतील. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (गुरुवार) काढला आहे.
राजमातांचे वकीलपत्र मागे घे, अन्यथा संपवू : दाेघांची धमकी 
 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सुरवातीला कडक लॉकडाउन राबवण्यात आले. त्यानंतर शासनाच्या धोरणाप्रमाणे टप्प्याटप्प्याने लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यात आली. काही नियम व अटींवर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. 

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनच्या शिथिलतेत थोडा बदल केला आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व मार्केट व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू ठेवाण्याची मुभा होती. पण, नागरीक विनाकारण बाहेर पडून गर्दी करू लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने आजपासून 31 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानांबाबत तेथील प्रांताधिकारी निर्णय घेतील असे आदेशात म्हटले आहे.

सातारकरांनो सावध व्हा; कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे सावट

महत्त्वाची बातमी : सातारकरांनाे या दिवशी पाणी येणार नाही
 
प्रांताधिकारी म्हणाले, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Collector Issued Order Of New Timing For Shopkeepers From Satara District