esakal | हद्दवाढ भागाच्या विकासासाठी कटिबद्ध : उदयनराजे भोसले
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजे भोसले

हद्दवाढ भागाच्या विकासासाठी कटिबद्ध : उदयनराजे भोसले

sakal_logo
By
उमेश बांबरे -सकाळ वृत्तसेवा

सातारा : हद्दवाढ झालेल्या भागाचा मूलभूत विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. त्यासाठी लागणारा निधी राज्य आणि केंद्राकडून उपलब्ध करून घेणे, नगरपालिकेच्या स्वनिधीतून विकास साधणे असे विविध प्रयत्न सुरू आहेत. हद्दवाढ झालेल्या ठिकाणी आम्ही विकासाकरिता कुठेही कमी पडणार नाही, असे मत सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

सातारा पालिकेच्या शाहूपुरी भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमात खासदार उदयनराजे बोलत होते. या वेळी पंचायत समिती माजी सदस्य संजय पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सिद्धार्थ निकाळजे, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!

सातारा पालिकेच्या हद्दीचा विस्तार होण्याबरोबरच जबाबदारीही वाढली आहे, असे सांगून उदयनराजे म्हणाले, ‘‘नगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिक पूर्वीपासूनच मनाने सातारा शहराशी एकरूप झालेले होते. पूर्वीही अत्यावश्यक नागरी सेवा या भागात सातारा नगरपालिका अपवादात्मक परिस्थितीत पुरवीत होती. या भागातील संपूर्ण कचरा पालिकेच्या मालकीच्या सोनगाव कचरा डेपोवरच टाकला जात होता. आता रीतसर हद्दवाढ झाल्याने या भागातील नागरिकांना सोयीसुविधांसाठी नगरपालिकाला विचारणा करता येणार आहे. त्यामुळे निश्‍चितच नगरपालिकेची जबाबदारी वाढली आहे. म्हणूनच हद्दवाढ भागाला प्राधान्य देण्यात येऊन येथील रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, बंदिस्त गटार आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत.’’

या वेळी अमित कुलकर्णी, मुग्धा पुरोहित, शिरीष चिटणीस, गणेश आरडे, अनिरुद्ध दाभाडे, रमेश धुमाळ, राजेंद्र गिरीगोसावी, अमृता प्रभाळे, जवानमल जैन, सतीश कदम, अजित ग्रामोपाध्ये, भैरव चव्हाण, सुरेश साधले, प्रवीण औसेकर, पोतदार सर, मनीषा फरांदे, बगाडेकाका, रवी शिवणकर, प्रवीण शिंदे, अभिजित गाडे, किरण वाघमोडे, नासिर सय्यद, उमेश साळुंखे, आबा इंगवले, सिकंदर पाटोळे, दीपक घाडगे आदी उपस्थित होते.

loading image
go to top