Satara : ठेकेदाराने खड्डे बुजविले; पण अर्धवटच!

खटाव पूर्व भागातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांसह नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया
Satara news
Satara newsesakal

कलेढोण : साहेब, आमच्या रस्त्यावर लय खड्डे पडल्यात. त्यात तुमच्या खात्यानं कुठं- कुठं डांबर अन्‌ खडी टाकलीय? तरीपण रस्त्यावरचं अर्धवट खड्डे तसंच दिसत्यात. आता तुम्हीच सांगा, साहेब जखमेपेक्षा मलमपट्टी लहान असते का? ही हाक आहे, खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहनचालक व पादचाऱ्यांची.

Satara news
Vastu Tips : घरातील दागिन्यांची दिशा बदला, घरात सोन्या-नाण्याची कमी पडणार नाही

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून रस्त्यावरील अर्धे खड्डे बुजवीत शासनाच्या आणि वाहनचालकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे. खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तालुक्याचा सार्वजनिक बांधकाम खाते चर्चेत आहे. बिकट रस्त्यामुळे प्रवासी, वाहनचालकांचे अपघाताचे बळी ठरत आहेत.

Satara news
Astro Tips : दुसऱ्याची साडेसाती मागे लावून घ्यायची नसेल तर, कधीच कोणाकडून उधार घेऊ नका या गोष्टी

हे रस्ते आहेत खड्डेमय

मायणी-चितळी-म्हासुर्णे

मायणी-म्हसवड

मायणी-माळीनगर-दगडवाडी-पडळ

धोंडेवाडी-दातेवाडी-पडळ

पडळ कारखाना ते पडळ फाटा

कलेढोण ते तरसवाडी घाट

कलेढोण-पाचवड

tips

Satara news
Skin Care Tips: पायाला शेविंग करताना अशा चुका टाळा, अन्यथा त्वचेचे होईल भयंकर नुकसान

पडळ फाटा व मायणी ते म्हसवड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. कित्येक महिला दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाल्या आहेत. असे असूनही बांधकाम विभागाला जाग येत नाही. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

- प्रवीण पोरे, मायणी

पडळ कारखान्याकडे येणारा धोंडेवाडी, माळीनगर, दगडवाडी या रस्त्यावरील ठेकेदाराकडून अर्धवट बुजविले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल व वाहन चालविताना वाहनांची भीती वाटत आहे. ठेकेदाराने रस्त्यावरील अर्धे खड्डे बुजविलेच नाही.

- संजयकुमार शिंदे, कान्हरवाडी

नुसती लाली- पावडर कशाला?

मायणी-म्हासुर्णे रस्त्यावर आठवड्यापूर्वी अर्धवट भरलेले खड्डे पुन्हा रिकामे होऊ लागलेत. रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. बुजवलेले खड्डे म्हणजे तात्पुरती लाली पावडर कशाला? त्यासाठी रस्ताच नवा होणे गरजेचे असल्याचे चितळी ग्रामपंचायतीचे सदस्य अजित मोहिते यांनी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com