सकाळ सकाळी दाेघांच्या मृत्यूची बातमी धडकली, 'या' जिल्ह्यात काेराेनासह सारीचा प्रादुर्भाव वाढताेय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

सातारा जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या 1012 इतकी झालेली आहे. 

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शनिवार पेठ, कराड येथील 75 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान आज (साेमवार) सकाळी मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच रविवारी (ता.29) रात्री मलकापूर (ता. कराड) येथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सारी आजारामुळे दाखल झालेल्या 85 वर्षीय महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशियत म्हणून या महिलेचा नमुना उपचारादरम्यान घेतला असून तो पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

या धबधब्यावर चक्क पोलिस बंदोबस्त!

काळजीत पडला सातारा जिल्हा; लहान बालकांना कोरोनाची बाधा; संख्या हजारी पार

पाच वर्षांच्या चिमुकलीला आईने गॅलरीतून फेकून दिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Covid 19 And SAARI Patients Are Increasing In Satara District