धक्कादायक ! कोरोना केअर सेंटरमध्ये मुंबईकर संशयिताची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारली गेली आहेत. त्यामध्ये कोरोना बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवले जाते. त्यांच्या नमुण्याची तपासणी केली जाते. अहवाल आल्यानंतर त्यांच्याबाबत पुढील निर्णय घेतला जातो. त्या महाबळेश्‍वर येथील राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या जागेत कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. आज तिथेच गडबड झाली.

महाबळेश्वर, ता.31 : महाबळेश्वर येथील एकमेव कोरोना केअर सेंटरमध्ये झांझवड (ता. महाबळेश्‍वर) येथील एका कोरोना संशयिताने आज (रविवार) सकाळी नैराश्‍यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे तालुक्‍यात खळबळ माजली आहे. 

महाबळेश्वर शहर आज कोरोना मुक्त असले तरी, महाबळेश्वर तालुक्‍यातील ग्रामिण भागात मुंबई वरून आलेल्या लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज अखेर अशा प्रकारे मुंबई वरून आलेल्या 18 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या मध्ये गोरोशी गावातील एकाचा समावेश आहे. याच रूग्णाबरोबर आत्महत्या केलेला व्यक्ती मुंबईवरून आली होती. मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास केल्याने त्यालाही कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता होती. 

हे गृहीत धरून तालुका प्रशासनाने त्याला शनिवारी महाबळेश्वर तालुका कोरोना केअर सेंटर मध्ये भरती केले. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी सातारा येथे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. दरम्यान आज सकाळी त्याने खोलीतील गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला दारूचे व्यसन होते व कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला नैराश्‍य आल्याची माहिती गावातील लोकांकडून पुढे आली आहे. 

पोलिसांनी कोरोना केअर सेंटर व परीसरातील सर्व भागात प्रवेश बंदी केली होती. त्या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. या भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या घटनेची माहीती मिळताच प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी घटना स्थळी भेट दिली. या वेळी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, तालुका वैद्यकीय अधिकारी अजय कदम, पालिका मुख्याधिकारी अमिता दडगे-पाटील, गट विकास अधिकारी नारायण घोलप आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

मध्यरात्रीची कृष्णकृत्ये एलसीबीने केली उघड 

महत्वाची बातमी कोरोनाला रोखण्यासाठी सातारा पालीकेचा मोठा निर्णय

ही आहेत सातारा जिल्ह्याची कोरोना लढ्यातील दोन बलस्थाने


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Covid 19 Suspect Mumbaikar Youth is no More