निसराळेत बैलगाडी शर्यत घेणाऱ्या सात जणांवर गुन्हा

khatav
khatav
Updated on

नागठाणे (जि. सातारा) : निसराळे (ता. सातारा) येथे बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेल्या सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई करताना महिला पोलिस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की करून जखमी केल्याप्रकरणी त्यातीलच एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली. त्यात पोलिसांनी तीन बैल, तीन दुचाकी व दोन जीपही ताब्यात घेतल्या आहेत. 

अमोल शंकर शिंदे (वय 27, रा. चरेगाव, ता. कऱ्हाड), जालिंदर लक्ष्मण भोसले (वय 40, रा. शेंद्रे, ता. सातारा), सागर मंगेश पवार (वय 24), गौरव रणजित पवार (वय 19), विश्वनाथ पांडुरंग पवार (वय 18), राहुल शिवाजी पवार (वय 31), कुलदीप विनायक पवार (वय 27, सर्व रा. वर्णे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

निसराळे येथील एका वस्तीजवळ बैलगाड्यांच्या शर्यती सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. या वेळी पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, हवालदार विशाल जाधव, विजय साळुंखे, किरण निकम व चालक कपिल टिकोळे हे तातडीने घटनास्थळी पोचले. पोलिसांना पाहताच तेथे एकच पळापळ सुरू झाली. या वेळी पोलिसांनी तेथून सात जणांना ताब्यात घेतले. संशयितांना ताब्यात घेतेवेळी त्यातील सागर मंगेश पवार हा त्याच्या दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी सागरने ढकलून दिल्याने डाळिंबकर या जखमी झाल्या. त्याचदरम्यान इतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सागर याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा व त्याच्यासह अन्य सर्व संशयितांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक फौजदार बाजीराव पायमल पुढील तपास करत आहेत. 

(संपादन ः संजय शिंदे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Asia's Second-Largest Banyan Tree in Maharashtra Amazes Tourists and Nature Lovers
Vadache Mhasve giant banyan tree history
landslide
yerala river flood water
Marathi News Esakal
www.esakal.com