esakal | ऊसतोड मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्‍टरला मिनीबसची जोरदार धडक; बीडसह कर्नाटकातील 18 जण जखमी

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

ऊसतोडणी मजुरांना घेऊन बीड जिल्ह्यात निघालेल्या ट्रॅक्‍टरसह ट्रॉलीला मिनीबसने मागून धडक दिल्याने 18 जण जखमी झाले आहेत.

satara
ऊसतोड मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्‍टरला मिनीबसची जोरदार धडक; बीडसह कर्नाटकातील 18 जण जखमी
sakal_logo
By
राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : ऊसतोडणी मजुरांना घेऊन बीड जिल्ह्यात निघालेल्या ट्रॅक्‍टरसह ट्रॉलीला मिनीबसने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात 8 ऊसतोड मजूर व मिनिबसमधील 10 प्रवासी असे 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका ऊसतोड मजुरासह बसमधील दोघे असे तिघे गंभीर आहेत. पुणे-बंगळूर महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. 

दत्तात्रय लिबाजी वाळभाट (वय 23 रा. आहेरवडगाव, ता. जि. बीड) या ऊसतोड मजुरासह मिनिबसमधील दोघे (नावे समजू शकली नाहीत) गंभीर जखमी आहेत. 7 ऊसतोड मजूर व मिनिबसमधील 6 प्रवासी अशी 13 जण किरकोळ जखमी आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्‍टर (एमएच 23 एएस 1636) ट्रॉलीमधून साहित्यासह आठ ऊसतोड मजुरांना घेऊन अथनी शुगरवरून आहेरवडगाव (जि. बीड) येथे जात होता. महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ ट्रॅक्‍टर आला असता चिकमंगळूरहून एंगेजमेंटसाठी 10 प्रवासी घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या मिनीबस (केए 18 सी 4159) चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मिनीबस वेगात पुढे जात ट्रॅक्‍टर ट्रॉलीला मागून जोरात धडकली. 

खून, मारामारी, घरफोडीतील 18 गुंड तडीपार; साताऱ्यात पोलिस अधीक्षकांची 4 टोळ्यांवर धडाकेबाज कारवाई

धडकेत ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधील आठ ऊसतोड मजूर, मिनीबसमधील 10 असे 18 जण जखमी झाले. जखमींपैकी एका ऊसतोड मजुरासह बसमधील दोघे असे तिघे गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी अमित पवार, दस्तगीर आगा, अमोल भिसे, अजित भोसले, योगेश पवार, भाऊसाहेब यादव, महेश होवाळ तातडीने अपघातस्थळी दखल झाले. अपघाताची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना दिली. पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेन बोलावून वाहने बाजूला घेतली व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे