सातारा-पुणे महामार्गावर ट्रकमधून हजार किलो वजनाच्या 18 लाखांच्या वेलदोड्याची चोरी

अशपाक पटेल
Friday, 22 January 2021

चोरीस गेलेल्या वेलदोड्याच्या बंडलची किंमत 18 लाख रुपये आहे.

खंडाळा (जि. सातारा) : सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा पार करून चहाच्या टपरीवर थांबलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी 18 लाख रुपये किमतीची एक हजार 800 किलो वजनाचे वेलदोडे चोरुन नेले. 

पोलिसांनी सांगितले की, चालक नागेश पुट्टी गौडा (वय 45, सध्या रा. यशवंतपूर, बंगळूर) हे बंगळूरहून वेलदोड ठेवलेले बॉक्‍स घेऊन भिवंडीला निघाले होते. सात ते आठ सप्टेंबर 20 या कालावधीत ते खंबाटकी बोगदा संपल्यानंतच चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी ट्रकच्या मागील बाजूचा लॉक तुटल्याचे त्यांच्या लक्षात आहे.

माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी उदयनराजेंनी जिल्ह्यासाठी काय केलं सांगावं; काँग्रेसच्या नेत्याचं जोरदार प्रतिउत्तर
त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी प्रत्येकी 50 किलो वजनाची एकूण 36 बंडल (1800 किलो वजन) वेलदोड्याचे (इलायची) बंडल चोरून नेले होते. चोरीस गेलेल्या वेलदोड्याच्या बंडलची किंमत 18 लाख रुपये आहे. खंडाळा पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News 18 Lakh Cardamom Stolen On Satara Pune Highway