esakal | धक्कादायक! सोन्याच्या डीलसाठी आलेल्या परप्रांतियांकडून पोलिसाला दांडक्याने जबर मारहाण

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

पाटण पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी मुकेश मोरे हे शासकीय कामानिमित्त साताराकडे त्यांच्या खासगी वाहनाने निघाले होते.

धक्कादायक! सोन्याच्या डीलसाठी आलेल्या परप्रांतियांकडून पोलिसाला दांडक्याने जबर मारहाण
sakal_logo
By
हेमंत पवार

उंब्रज (जि. सातारा) : पेरले (ता. कऱ्हाड) जवळील जानाई पेट्रोल पंपाच्यापुढे शिरगांवकडे जाणा-या रस्त्यावर सोन्याची डील करण्यासाठी आलेल्या चार परप्रांतीय संशयितांनी पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली. हवालदार मुकेश संभाजी मोरे यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात त्याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांची माहिती अशी : पाटण पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी मुकेश मोरे हे शासकीय कामानिमित्त साताराकडे त्यांच्या खासगी वाहनाने निघाले होते. त्यांना बातमी दारामार्फत पेरले गांवच्या हद्दीत सोन्याची डील होणार आहे, अशी बातमी मिळाली. यावेळी बातमी पडताळणी करीत असताना त्यांना संशयित चार इसम रस्त्याकडेला दिसले. यानंतर त्यांनी मी पोलिस आहे, तुम्ही इथं काय करताय, अशी विचारणा केली. त्यावर संबंधित चार संशयितांनी मोरे यांना शासकीय कामात व्यत्यय आणून शिवीगाळ करुन लाकडी दांडकी, गजाने मारहाण करुन जखमी केले. 

आनेवाडी-तासवडे टोलनाक्‍यावर सातारकरांना सूट द्या; खासदार उदयनराजे आक्रमक

त्यावेळी एकाने मोरे यांच्या उजव्या हाताच्या दंडाला चावाही घेतला आहे. याप्रकरणी पाटण पोलिस ठाण्याचे हवालदार मुकेश मोरे यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरुन संबंधित चार संशयिताविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी मोरे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पाटणचे पोलिस उपाधीक्षक अशोकराव थोरात यांनी रुग्णालयात भेट देवून मोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे