साताऱ्यात गुप्तीचा धाक दाखवून दोघांनी शिवथरच्या युवकाला लुटले

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : येथील मुख्य बस स्थानक परिसरातून निघालेल्या युवकाला गुप्तीचा धाक दाखवून चोरट्यांनी सोन्याच्या दोन साखळ्या जबरदस्तीने लंपास केल्या आहेत. याबाबत विशाल ऊर्फ शुभम विश्‍वास यादव (रा. शिवथर, ता. सातारा) याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. 

बुधवारी (ता. 3) बाराच्या सुमारास तो शहरातील मुख्य बस स्थानक परिसरातून निघाला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या 20 ते 22 वयोगटातील दोघांनी त्याला गुप्तीचा धाक दाखवत त्याच्याकडील एक लाख 20 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या हिसकावून पळ काढला. 

त्यावेळी यादव व मित्र प्रणव साबळे यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असताना एकाने प्रणवच्या तोंडावर गुप्तीचा वार केला. तर यादवच्या दोन्ही हातांवर वार करून त्यालाही जखमी केले. सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. उपनिरीक्षक भंडारे तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com