चाईल्ड हेल्प लाइनचा नंबर आला कामी; विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकास सात दिवसांची कोठडी

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

महाबळेश्‍वर (जि. सातारा) : अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकास महाबळेश्वर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पीडित मुलीच्या मैत्रिणीने चाईल्ड हेल्पलाइनवरून मदत मागितल्याने हे प्रकरण उघडकीस आले. 

शहरातील हायस्कूलमधील दिलीप रामचंद्र ढेबे या मुख्याध्यापकाने पदाचा दबाव आणून दहावीत शिकत असलेल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकाला जेरबंद केले. मुख्याध्यापक आपल्यावर वारंवार अत्याचार करीत असल्याची माहिती पीडित मुलीने मैत्रिणीला सांगितली होती. 

त्याच हायस्कूलमध्ये 22 फेब्रुवारी रोजी लैंगिक अत्याचारावर सहायक पोलिस निरीक्षक अब्दुल हादी बिद्री यांनी मार्गदर्शन केले होते. या वेळी चाईल्ड हेल्प लाइनचा क्रमांक मुलींना दिला होता. पीडितेच्या मैत्रिणीने हेल्प लाइनवरून मैत्रिणीवर अत्याचार होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Karad flyover opening delayed
Political Show of Unity in Karad as Corporators Arrive Together for Voting
Khed Mahabaleshwar cable stayed bridge
Political Use of Cooperative Sector Under Fire as Prithviraj Chavan Demands Reform
Marathi News Esakal
www.esakal.com