'तुम्ही गावात माझी बदनामी का करता?'; राणंदला पुतण्याकडून चुलत्यावर सुऱ्याने हल्ला

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on: 

दहिवडी (जि. सातारा) : "तुम्ही माझी गावात चर्चा करून माझी बदनामी का करता?' असे म्हणत पुतण्याने चुलत चुलत्यावर लोखंडी सुऱ्याने वार करत जखमी केल्याची घटना राणंद (ता. माण) येथे घडली आहे. 

याबाबतची माहिती अशी, राणंद येथील पोपट रामहरी शिंदे (वय 59) हे गुरुवारी स्वतःच्या शेतातील ज्वारी काढण्याचे काम कुटुंबीयांसमवेत करत होते. साधारण साडेतीनच्या सुमारास त्यांचा चुलत पुतण्या प्रताप उदयसिंह शिंदे हा तिथे आला. त्या वेळी त्याच्या हातात लोखंडी सुरा होता. प्रताप हा पोपट शिंदे यांना तुम्ही माझी गावात चर्चा करून बदनामी का करता, असे म्हणाला. त्यावर मी तुझी कोणाकडे बदनामी केली नाही अन्‌ जर तुला असे कोणी म्हणत असेल तर समोर घेऊन ये, असे पोपट शिंदे हे प्रतापला म्हणाले. त्या वेळी रागात येऊन प्रताप याने पोपट शिंदे यांच्या डोक्‍यात सुरा मारला. 

पोटावर, छातीवर सुरा मारण्याचा प्रयत्न केला; पण प्रसंगावधान राखत पोपट शिंदे हे पाठीमागे सरल्याने त्यांच्या पोटावर, छातीवर ओरखडण्यापर्यंत जखमा मर्यादित राहिल्या; परंतु डोक्‍यातील जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिथेच असलेल्या पोपट शिंदे यांच्या पत्नी लतिका यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्या वेळी प्रताप हा लतिका यांच्या अंगावर धावून गेला व त्यांना अश्‍लील शिवीगाळ केली. दोघांनाही जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देत प्रताप तिथून निघून गेला. पोपट शिंदे यांच्या डोक्‍याला मोठी जखम झाली असून, सात टाके पडले आहेत. प्रताप शिंदे याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी एक मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस शिपाई मल्हारी हांगे अधिक तपास करत आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

karad ganpati visarjan
Satara Shahupuri Police Bribe Case
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators
Sugarcane Agitation
Marathi News Esakal
www.esakal.com