esakal | पाेलिसांची 'गंमत जंमत' सह दुकानदारांवर कारवाई

बोलून बातमी शोधा

Crime News
पाेलिसांची 'गंमत जंमत' सह दुकानदारांवर कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मोडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी पाच व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. शहर पोलिसांनी अमरलक्षी परिसरातील मोमीन चिकन सेंटर अँड एग्जचे महंमद दस्तगिर शेख (रा. धनगरवाडी, ता. सातारा), देगाव फाटा येथील रॉयल जेन्टस पार्लरचे सुभाष गंगाराम जांभळे, भंडारी हाईटस्‌ येथील माऊली किराणा स्टोअर्सचे दिनेश उत्तम रणसिंग, अहिरे कॉलनी येथील किराणा दुकानाचे लक्ष्मण आकाराम जाधव (रा. करंडी, ता. सातारा), माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावरील गंमत जंमत वाईन शॉपचे प्रदीप श्रीरंग मोरे (रा. आंबेदरे, ता. सातारा), नवीन औद्योगिक वसाहतीमधील झेंडा चौकातील गुरुकृपा टायर वर्क्‍सचे प्रीतम संतोष बर्गे (रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) याच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नुकसान केल्याने तिघांवर गुन्हा

सातारा : सोनगाव तर्फ सातारा (ता. सातारा) येथे एकाच्या शेतात बेकायदेशीर अतिक्रमण करत ताली-बांध तोडून दीड लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पांडुरंग केशव नावडकर, प्रकाश जाधव, शिवाजी महादेव धोंडवड (सर्व रा. सोनगाव तर्फ सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हणमंतराव रामराव घाडगे (रा. संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांनी शेतजमिनीत अतिक्रमण करून जमिनीच्या ताली व बांध तोडून टाकले, तसेच बाभळीचे झाड काढून टाकले, तसेच तुम्ही बाहेर गावचे आहात, अख्खे गाव तुमच्यावर घालीन, अशी धमकी दिली. या वेळी त्यांनी चेहऱ्यावर कोणतेही मास्क परिधान न करता व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता कोविड 19 च्या नियमांचेही उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार भोईटे तपास करत आहेत.

ऐकावे ते नवलच : नांदेड जिल्ह्यात या गावात कोरोना संसर्गापासून बचावासाठी बकऱ्यांनाही मास्क!

दारूप्रकरणी एकावर कारवाई

सातारा : जरंडेश्‍वर नाका येथील दारूअड्ड्यावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी 35 हजार 280 रुपयांच्या देशी दारूच्या 48 बाटत्या व दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी पंकज ऊर्फ दीपक ज्ञानेश्‍वर पवार (रा. मोरे कॉलनी, मंगळवार पेठ,) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मटकाप्रकरणी एकावर कारवाई

सातारा : कोडोली येथील कमानीच्या पत्र्याच्या आडोशाला मटका घेणाऱ्यावर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. जितेंद्र लादमल शहा (वय 56) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 1 हजार 260 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दुचाकीस्वारावर गुन्हा

सातारा : करंजे नाका येथे दारूच्या नशेत भरधाव दुचाकी चालवून पादचाऱ्यास ठोकरल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे. ओंकार राजेंद्र काळभोर (रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबत हवालदार कारळे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सातारा : 1100 बेडची झाली उपलब्धता; जाणून घ्या काेठे आहे सुविधा