esakal | सातारा : 1100 बेडची झाली उपलब्धता; जाणून घ्या काेठे आहे सुविधा

बोलून बातमी शोधा

covid care center
सातारा : 1100 बेडची झाली उपलब्धता; जाणून घ्या काेठे आहे सुविधा
sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने 13 कोरोना केअर सेंटर (सीसीसी) सुरू केली आहेत. यामध्ये सुमारे एक हजार 100 बेड उपलब्ध झाल्याने रुग्णांची गैरसोय टळणार आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानंतर ऑक्‍टोबर ते जानेवारी या कालावधीत रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रित आल्याने 26 कोरोना सेंटरपैकी केवळ एका ठिकाणी सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. नागरिकांना बेड अपुरे पडू लागल्याने पुन्हा प्रत्येक तालुक्‍यात सीसीसी सुरू करण्यात आले आहेत.

मार्च ते सप्टेंबर या महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने बाधितांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. यामध्ये बाधित रुग्ण, संशयित रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून उपचारासाठी सुविधा दिल्या जातात. सद्य:स्थितीत रुग्णसंख्या वाढल्याने जिल्ह्यातील पुन्हा कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

'आहे त्या मनुष्यबळावर सेवा द्या'; आता मनसेच्या भुमिकेवर लक्ष

असे असते कोरोना केअर सेंटर

ज्यांना काेवडिची बाधा झालेली आहे. त्यांच्या संपर्कातील लाेकांना ज्यांच्याकडे गृहविलगीकरणाची सुविधा अशा लाेंकाना या काेराेना केअर सेंटरचा लाभ घेता येताे. या ठिकाणी असलेले उपल्ब्ध वैद्यकीय कर्मचारी त्यांचा काळजी घेतात. या ठिकाणी काेणत्याही प्रकाराची रुग्णालयात असलेले उपाचारासाठीची यंत्रणा नसते.

याठिकाणी बेड उपलब्ध

जावळी तालुक्‍यातील रायगाव येथे 68 बेड, कऱ्हाड तालुक्‍यात सह्याद्री सहकारी साखर कारखाना 122 बेड, खंडाळा तालुक्‍यात जगताप हॉस्पिटल 70, खटाव तालुक्‍यात प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव 70, शासकीय मुलींचे वसतिगृह 100, कोरेगाव येथे 75, महाबळेश्‍वर तालुका 50, माण तालुक्‍यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह म्हसवड 100, दहिवडी येथे 60, पाटण तालुक्‍यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह 50, फलटण तालुक्‍यात समाजकल्याण वसतिगृह जाधववाडी 80, सातारा तालुक्‍यात महिगाव येथे सूर्योदय टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमध्ये 200 बेड असे एकूण एक हजार 100 बेड आरोग्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आले आहेत.

राज्यात जिल्हाबंदी लागू असल्यानं आता प्रवासासाठी ई पास गरजेचा आहे. जाणून घ्या कसा काढायचा?

युवक काँग्रेसच्या हालचाली; जगताप हॉस्पिटलला काेविडची मान्यता

माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू