दहिवडीत अंधश्रद्धेतून मुलीचा बळी?; माण तालुक्यातील दोन देवऋषींना पोलिस कोठडी

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : अंधश्रद्धेतून मुलीच्या बळी प्रकरणातील संशयित दोन्ही देवऋषींना दहिवडी पोलिसांनी काल ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी दोघांनाही दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, अधिक तपास सुरू आहे. 

दोन कथित "देवऋषीं'च्या भूत लागल्याच्या सल्ल्याला भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची बातमी शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. काल या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी वेगाने हालचाली करून उत्तम अवघडे (गोंदवले, ता. माण) व रामचंद्र सावंत (मोही, ता. माण) हे दोन्ही देवऋषी ताब्यात घेतले. मृत मुलीच्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी पोलिस पथक पाठवले. या पथकाने कुटुंबीयांना मायणी (ता. खटाव) येथून ताब्यात घेऊन दहिवडी येथे आणले. 

दरम्यान, या घटनेबद्दल सुनील काटकर (रा. दहिवडी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे, की मुलीचा चुलत मामा निखिल बुरुंगले याच्याकडून बायली इंगवले हिच्या मृत्यूबाबत मिळालेल्या माहितीवरून झालेला प्रकार गंभीर असून, या विरोधात दाद मागणे आवश्‍यक असल्याचे श्री. काटकर यांनी श्री. बुरुंगले यांना सांगितले. श्री. काटकर यांनी त्यांचे मित्र सातारा येथील अंनिसचे प्रशांत पोतदार यांच्याशी संपर्क साधून सर्व घटना सांगितली. श्री. पोतदार यांनी एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा होण्यास भूताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणे आणि तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी तिला अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य व उपाय करण्यास प्रवृत्त करणे हा गंभीर अपराध आहे, असे सांगितले. 

त्यानुसार श्री. काटकर यांनी शुक्रवारी दोन्ही देवऋषीविरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून दोन देवऋषींच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसेच घटनास्थळाचा आज पंचनामा करण्यात आला. या घटनेमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करत आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com