esakal | साताऱ्यातील ट्रक चालकाच्या अपहरणाप्रकरणी विजापूरच्या तिघांना अटक

बोलून बातमी शोधा

Crime News

साताऱ्यातील ट्रक चालकाच्या अपहरणाप्रकरणी विजापूरच्या तिघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : ट्रकसह चालकाचे अपहरण केल्याप्रकरणी निपाणी पोलिसांनी विजापूर येथील तीन संशयित आरोपींना मंगळवारी अटक केली. संशयितांकडून चोरी केलेला 14 लाखाचा ट्रक, चोरीसाठी वापरलेली तीन लाखाची कार यासह मोबाईल यासह सुमारे १७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आप्पाचीवाडी फाट्याजवळ ही घटना घडली होती. युवराज उमलू राठोड (वय 30), सुरेश उमलू राठोड (34), मुत्तू उमलू राठोड (32, सर्व रा. कुमटगी. जि. विजयपूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

अर्जुन भिमराव सुपेकर (रा. सातारा) यांनी कलाप्पा केंचाप्पा बेळगली (रा. विजापूर) यांच्या नावावर असणारा ट्रक फायनान्स कंपनीच्या लिलावाव्दारे खरेदी केला होता. खरेदी केलेला ट्रक बळ्ळारी येथील फायनान्स कंपनीतून सात एप्रिलला सुपेकर यांच्याकडे कामावर असणारा चालक रमेश प्रल्हाद पवार (रा. पवारवाडी, ता. खटाव. जि. सातारा) याने ताब्यात घेतला. ट्रक घेऊन रमेश साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, ट्रकची काही कामे कोल्हापूर येथे करून घ्यायची होती, म्हणून रमेशने त्यादिवशी रात्री आप्पाचीवाडी फाट्याजवळ मुक्काम केला.

विक्रेत्यांनाे! एका जागी बसून भाजी विकू नका; गुन्हा दाखल हाेईल

आठ एप्रिलला सकाळी रमेश महामार्गाच्या सेवारस्त्यावर नाष्टा करण्यासाठी थांबला होता. तेथे एका गाडीतून आलेल्या आठ जणांनी रमेशचे अपहरण केले. यावेळी एकाने ट्रक ताब्यात घेऊन तेथून पळ काढला. तेथून चोरट्यांनी रमेशला गाडीतून विजयपूरला नेले. जाताना मोटारीत त्याला मारहाण केली, मोबाईल, एटीएम कार्ड, साडे सात हजार रुपयांची रोकड त्यांनी काढून घेतली. एटीएम कार्डचा पासवर्ड विचारून कार्डवरून अडीच हजार रुपये चोरट्यांनी काढले. नऊ एप्रिलपर्यंत रमेशला चोरट्यांनी त्यांच्या विजापूरातील घरीच ठेवले होते. तेथून अर्जुन सुपेकर यांनी चोरट्यांच्या तावडीतून रमेशची सुटका केली असे पाेलिसांनी सांगितले.

चिंताजनक! साताऱ्यात सहा तालुके कोरोनाच्या विळख्यात; जिल्ह्यात अनेक गावं 'हॉटस्पॉट'