
बेकरीच्या काउंटरच्या ड्राव्हरमध्ये साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. यात प्रत्येकी दोन तोळ्याची पाच वेढणी, प्रत्येकी अर्धा तोळ्याची दोन वेढणी असे 11 तोळे होते.
सातारा : येथील सिव्हिल कॉलनी परिसरातील बेकरीत झालेल्या घरफोडीत साडेचार लाखांच्या सोन्याचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
महेश शंकर तडाखे (वय 18, रा. साईबाबा मंदिराजवळ, गोडोली) व जयश्री शंकर यादव (वय 42, रा. अहिरे कॉलनी, संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत आकाश राजेंद्र यादव (रा. गोडोली) यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यांची सिव्हिल कॉलनीमध्ये "फ्रेंड बेकरी' आहे. त्यांनी बेकरीच्या काउंटरच्या ड्राव्हरमध्ये साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते.
ग्रेड सेपरेटरनंतर महामार्गावरील उड्डाण पुलाचे नामकरण; उदयनराजे समर्थकांचा प्रशासनाला आणखी एक दणका
यामध्ये प्रत्येकी दोन तोळ्याची पाच वेढणी, प्रत्येकी अर्धा तोळ्याची दोन वेढणी असे 11 तोळे होते. सोमवारी (ता. 18) बनावट चावीचा वापर करून ड्राव्हर खोलून ते लंपास करण्यात आले होते. याबाबत त्यांनी काल दुपारी फिर्याद दिली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली. उपनिरीक्षक नानासाहेब कदम तपास करत आहेत.
भाजपचे आमदारही आता खोटं बोलू लागलेत; राष्ट्रवादीच्या पवारांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला
संपादन : बाळकृष्ण मधाळे