esakal | कुमठ्यातील 8 जणांकडून आसरेतील तिघांना डोक्‍यात बादलीने मारहाण

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

रात्री सव्वाआठच्या सुमारास अज्ञाताने मोबाईलवर फोन करून आर्यन यास शिवीगाळ, दमदाटी केली.

कुमठ्यातील 8 जणांकडून आसरेतील तिघांना डोक्‍यात बादलीने मारहाण
sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : दुचाकी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून आसरे (ता. कोरेगाव) येथील तिघांना मारहाण करत झटापटीमध्ये महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी धारनाथनगर, कुमठे (ता. कोरेगाव) येथील आठ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात कांचन दीपक सणस (रा. आसरे, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की काल (ता. 1) सायंकाळी सातच्या सुमारास मुलगा आर्यन व दीर सूरज दिगंबर सणस हे दोघे जण कोरेगाव येथून दुचाकीवरून घरी येत होते. त्या वेळी त्यांच्या दुचाकीने वैभव चव्हाण (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कुमठे, ता. कोरेगाव) याच्या दुचाकीला ओव्हरटेक केले. त्यानंतर रात्री सव्वाआठच्या सुमारास अज्ञाताने मोबाईलवर फोन करून मुलगा आर्यन यास शिवीगाळ, दमदाटी केली. 

फलटणात खून, दरोडा, घरफोडीतील नऊ गुन्हे उघडकीस; तालुक्यातील चारजण पोलिसांच्या ताब्यात

काही वेळाने घरासमोर कुणाल बाळकृष्ण चव्हाण, वैभव चव्हाण, सौरभ चव्हाण, वैभव चव्हाण (पूर्ण नावे माहीत नाहीत, सर्व रा. धारनाथनगर, कुमठे, ता. कोरेगाव) व अन्य अनोळखी चौघे जण आले. या सर्वांनी आर्यन, तसेच दीपक यांना हाताने आणि सूरज यांना डोक्‍यात बादलीने मारहाण केली. या वेळी झालेल्या झटापटीत कुणालने कांचन यांच्या गळ्यातील 46 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे