esakal | लग्नसोहळ्यानंतर चाळकेवाडीतील दोघांवर गुन्हा नाेंद

बोलून बातमी शोधा

Crime News
लग्नसोहळ्यानंतर चाळकेवाडीतील दोघांवर गुन्हा नाेंद
sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : सोशल डिस्टन्सिंग व उपस्थितीबद्दलचे नियम पायदळी तुडवत चाळकेवाडी (ता. पाटण) येथे रविवारी दुपारी उरकलेला लग्नसोहळा संबंधितांना चांगलाच महागात पडला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांची माहिती अशी, कुंभारगाव विभागातील चाळकेवाडी येथे एका घराजवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करत विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी श्रींरंग तांबे यांना मिळाली होती. त्यांनी येथील पोलिसांना याबाबत खात्री करण्याच्या सूचना दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. बी. राक्षे व त्यांच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केली असता सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत पंचवीसपेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकल्याचे दिसून आले. याप्रकरणी हवालदार राजेंद्र घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा