उंब्रज-सातारा मार्गावर धावत्या बसमधून सोन्याची चैन लंपास; चोरट्यांचा धूमस्टाईल पोबारा

प्रवीण जाधव
Friday, 22 January 2021

सातारा शहरात आज दुपारी यादव गोपाळपेठ सुपनेकर मेसजवळ एका महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी लांबवली.

सातारा : उंब्रज ते सातारा या मार्गावर एसटी बसने प्रवास करताना प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे नेकलेस चोरटल्याने लंपास केले आहे. 

जान्हवी उमेश रसाळे (रा. सोनगाव, क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. रविवारी (ता. 17) त्या उंब्रजहून एसटीने साताऱ्याकडे येत होत्या. या वेळी त्यांच्या गळ्यात 40 हजार रुपये किमतीचे नेकलेस चोरट्याने लंपास केले. येथील मुख्य बस स्थानकात उतरल्यानंतर त्यांच्या हे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हवालदार पवार तपास करत आहेत. 

आहेर नको, रक्तदान करा! पुण्यातील आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा; माजी मंत्र्यांकडूनही कौतुक

तसेच शहरात आज दुपारी 12.36 वाजण्याच्या सुमारास यादव गोपाळपेठ सुपनेकर मेसजवळ एका महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी लांबवली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने बाहेर फिरणे मुश्कील बनले आहे. मात्र, याबाबात महिलेने पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नाही, परंतु असे सर्रास प्रकार शहारात घडत असल्याने सुक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Breaking News : उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाच निर्वाळा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Woman Gold Chain Was Stolen In Satara City

Tags
टॉपिकस
Topic Tags: