Satara Crime : अंधारीत युवकाचा संशयास्पद मृत्यू; मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अंधारी येथील आडवीरा नावाच्या शिवारात युवकाचा मृतदेह सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मेढा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
कास : कास ते बामणोली रस्त्यावर अंधारी (ता. जावळी) गावच्या हद्दीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय गणपत शेलार (वय ३२, रा. अंधारी) असे मृताचे नाव आहे.