Satara : तडीपारी आदेशाचा भंग केल्याने साताऱ्यात गुंडास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सातारा : तडीपारी आदेशाचा भंग केल्याने साताऱ्यात गुंडास अटक

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा - तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात फिरणाऱ्या गुंडास शहर पोलिसांनी अटक केली आहे. विकास मुरलीधर मुळे (वय २०, रा. पॉवर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे.

विकास मुळे याच्यावर शहर पोलिस ठाण्यात चोरीचे नऊ गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला ऑगस्ट २०२१ मध्ये पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे, तरीही तो शहरात खुलेआम फिरत होता. याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याला अटक केली. त्याच्यावर तडीपारी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: सिनेस्टाइल पाठलाग करून फरारी गुन्हेगारास पकडले

पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अभय साबळे, सागर गायकवाड, धुमाळ, कचरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, साताऱ्यातून आमीर मुजावर (रा. पिरवाडी), आमीर शेख (रा. वनवासवाडी), प्रल्हाद पवार (रा. केसरकर पेठ), जीवन रावते (रा. कोडोली), अभिजित भिसे (रा. कोडोली), जगदीश मते (रा. शाहूपुरी), सौरभ जाधव (रा. मोळाचा ओढा), आकाश पवार (रा. सैदापूर) यांचा समावेश आहे. यापैकी कोणीही शहरात फिरत असल्यास नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.

loading image
go to top