esakal | Satara | विजयादशमीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीला मंदीचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

 विजयादशमीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीला मंदीचा फटका

सातारा : विजयादशमीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीला मंदीचा फटका

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वच काही ठप्प आहे. आता कुठे बाजारपेठ पूर्वपदावर येऊ लागल्याने बाजारात मंदीचेच वातावरण आहे. त्यामुळे कोरोनानंतर प्रथमच येणाऱ्या उद्या (शुक्रवार) च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने, चांदीचे दागिने खरेदीवर परिणाम झाला आहे. सोन्याचे वाढलेले दर आणि लोकांचे कोरोनामुळे कोलमडलेले बजेट यामुळे यावर्षी मुहूर्तावरील सोने, चांदी खरेदीसाठी सराफ कट्टे गर्दीने फुलणर नाहीत.

मुहूर्तावर घरी गुंजबर तरी सोने यावे, अशी सर्वसामान्य गृहिणींची इच्छा असते. त्यामुळे गुढीपाडवा, विजयादशमी आणि दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सोने, चांदीच्या दागिन्यांची खरेदी होते. प्रत्येक वर्षी विजयादशमी दिवशी आपट्याच्या पान्याचे सोने लूटून सर्वसामान्य थोडेफारतरी सोने घरी आणतात. पण गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेले मार्केटमुळे सर्वजण आर्थिक अडचणीत आहेत. कोरोनानंतर आता कुठे बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. पण, कोरोनात बसलेले धक्के लक्षात घेता कोणाकडेच हौसेसाठी दागिने खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे यावर्षी कोरोनानंतर होणाऱ्या पहिल्या विजयादशमीच्या मुहूर्तवर सोने, चांदीचे दागिने खरेदीवर परिणाम जाणवणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या दोन चार दिवसांत सोन्याचे वाढलेले दर आणि कोरोनामुळे लोकांचे कोलमडलेले बजेट यामुळे मुहूर्तावर सोने खरेदीकडे लोकांना कल नाही.

हेही वाचा: Pune Crime : गुगल पे करताना झालेली मैत्री तरुणीला पडली महागात

सराफ कट्ट्यावर विजयादशमीला गर्दी होते. पण यावेळी त्यामध्ये परिणाम जाणवणार आहे. विजयादशमीसाठी सराफ दुकानदारांकडून कोणतीही ऑफर नसते. ऑफर दिवाळीला असते. त्यातच कोरोनात लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच व्यावसाय बंद राहिल्याने व्यावसायिकांकडेही पुरेसे पैसे नाहीत. आताकुठे बाजारपेठ फुलू लागली असल्याने मागणीनुसार माल उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिकांना पैसे कमी पडू लागले आहेत. त्यामुळे एकुणच मार्केट स्लो डाउन आहे. कोरोनातही सोने, चांदीचे भाव तेजीत आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून सोने, चांदीचे दर वाढले असून हजार ते दीड हजार रुपयांनी दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे याचा परिणाम खरेदीवर होणार आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने, चांदीचे दागिने खरेदीवर परिणाम झाल्याचे पहायला मिळणार आहे. तरीही लोक काही तरी मुहूर्तावर काहीतरी खरेदी करतील, अशी आशा असल्याने सराफ कट्टे सजले आहेत.

कोरोनानंतर प्रथमच होणाऱ्या विजयादशमीसाठी सराफ बाजारपेठ सजली आहे. पण वाढलेले सोन्याचे दर आणि कोरोनात मंदावलेली बाजारपेठ व लोकांकडे पैशाची कमतरता यामुळे मुहूर्तावरील सोने, चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर यावर्षी परिणाम जाणवणार आहे.

- कृणाल किशोर घोडके (घोडके सराफ, सातारा)

loading image
go to top