कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साताऱ्यात 'हे' करा : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या चर्चेनंतर सातारा जिल्ह्यातील काेराेना रुग्णांच्या संख्येचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडून घेतली.

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने शक्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी शेखर यांना दिले. तसेच यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्याची तयारीही उपमुख्यमंत्र्यांनी दर्शवली.

सातारा येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसंदर्भात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनातील सभापतींच्या दालनात आज (गुरुवार) व्हिडिआे काॅन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील (व्हीसीद्वारे), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, वित्त, वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींसह सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह (व्हीसीद्वारे) उपस्थित होते.

या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या चर्चेनंतर सातारा जिल्ह्यातील काेराेना रुग्णांच्या संख्येचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडून घेतली. वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. हा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी सिंह यांना केली.

Video : लॉकडाऊनच्या कालावधीत या नियमांचे पालन करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतू लागल्याने माणदेशात सामान्यांना भरली धडकी, का ते वाचा 

राज्यातील नाट्यगृहे, ग्रंथालये खूली करा : उदयनराजे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Do Neccessary Things To Control Coronavirus In Satara City Orders Deputy Chief Minister Ajit Pawar To Collector Satara