Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिन्ही राजेंची माघार; ९ जागा बिनविरोध, १२ जागांसाठी २८ उमेदवार, नेमकं काय घडलं?

Satara District Bank Election Sees Veteran Leaders Withdraw: उदयनराजे ते शिवेंद्रसिंहराजे; सातारा जिल्हा बँक निवडणुकीत नेमकं काय घडलं?
Satara District Bank Polls Enter Final Phase as Senior Leaders Withdraw Nine Seats Go Unopposed and 12 Seats Face Competition

Satara District Bank Polls Enter Final Phase as Senior Leaders Withdraw Nine Seats Go Unopposed and 12 Seats Face Competition

sakal

Updated on: 

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संचालकपदाच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या. आता १२ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढता येणार नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या दिग्गज नेत्यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे या संचालकांचा समावेश आहे. आमदार मनोज घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अखेरच्या दिवशी नऊ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १२ जागांसाठी येत्या एक नोव्हेंबरला मतदान होणार असून, तीन नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com