

Satara District Bank Election 2026 Sees Fierce Contests Within Mahayuti as BJP NCP and Shiv Sena Fight for Control
sakal
सातारा : जिल्हा परिषदेत राबवलेले ऑपरेशन कमळ यावेळेस जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीतही राबवून भाजपच्या नेत्यांनी बॅंक ताब्यात घेण्याचे मनसुबे यशस्वी करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. बिनविरोध झालेल्या नऊ संचालकांमध्ये भाजपचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, तर शिवसेनेच्या एका संचालकाचा समावेश आहे. आता १२ ठिकाणी तुल्यबळ लढत होत असून, सात ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांत, तर तीन ठिकाणी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांत लढत आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई हेही रिंगणात असल्याने त्यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.