Good Job : जिल्हा बॅंकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; कोरलं 'आयएसओ' मानांकनावर नाव

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

सातारा : जागतिक स्तरावरील ग्राहक सेवा व कामकाज व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड निश्‍चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डायझेशन (आयएसओ) सर्टिफिकेशन प्रदान करणाऱ्या बीएसआय या आंतरराष्ट्रीय कंपनीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस सर्वकष गुणवत्तेसाठी आयएसओ 2001-2015 मानांकन सर्टिफिकेट प्रदान केले आहे. 

कंपनीचे भारतातील सेल्स व मार्केटिंगचे डायरेक्‍टर कपिल महाजन व पुणे शाखेचे प्रमुख शैलेश कुलकर्णी यांच्यातर्फे नुकतेच हे मानांकनाचे प्रमाणपत्र बॅंकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व उपाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी बॅंकचे संचालक व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, विक्रमसिंह पाटणकर, मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, नितीन पाटील, राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, अर्जुनराव खाडे, प्रदीप विधाते, वसंतराव मानकुमरे, संचालिका कांचन साळुंखे, सुरेखा पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते. या मानांकन आयएसओ 9001:2015 स्टॅंडर्डच्या आवश्‍यकतेनुसार अपग्रेड करण्याच्या दृष्टीने बॅंकेने सर्व कामकाज अद्ययावत केल्याने बॅंकेच्या सर्वंकष प्रगतीसाठी याचा लाभ होणार आहे. यासाठी पुणे येथील प्रोसेस लॉजिक्‍सचे कन्सल्टंट सत्यजित ढमढेरे यांनी सहकार्य केले.

या वेळी रामराजे निंबाळकर म्हणाले, ""शासन व नाबार्ड यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार बॅंकेने नेहमीच ग्राहकाभिमुख धोरणांचा स्वीकार केला आहे. बॅंकेचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला असून, या मानांकनामुळे बॅंकेने सहकारी बॅंकिंग क्षेत्रापुढे चांगला आदर्श निर्माण केला आहे.'' बाळासाहेब पाटील म्हणाले, ""बॅंकेने सेवेचे जाळे ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांपर्यंत पोचविले असून, ग्राहकांना आधुनिक बॅंकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बॅंकेचे उत्कृष्ट कामकाजामुळेच बॅंकेस नाबार्ड, तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले असून, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बॅंक म्हणून बॅंकेची नोंद झालेली आहे.'' शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. सरकाळे यांचेही भाषण झाले. याप्रसंगी बीएसआय कंपनीचे संचालक कपिल महाजन यांनी बॅंकेच्या ग्राहकाभिमुख सेवा व सर्वंकष कामकाजाची प्रशंसा करून आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com