

Satara Jilha Bank President Election
esakal
Satara District Bank chairman and vice chairman election news : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत बँकेवर सत्ता स्थापन केली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची निवड झाली. या राजकीय घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी झालेल्या राजकीय घडामोडींचा वचपा या निवडीत काढल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.