सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणीस थंड प्रतिसाद

 e-crop
e-cropesakal
Summary

सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वस्तरावर प्रयत्न करत असताना प्रतिसाद मात्र, थंड मिळत आहे.

कोरेगाव (सातारा): सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वस्तरावर प्रयत्न करत असताना प्रतिसाद मात्र, थंड मिळत आहे. जिल्ह्यातील एक हजार ७१५ गावांमधील सात लाख ४४ हजार ९४२ पैकी कालअखेर केवळ एक लाख ४२ हजार ५१२ म्हणजे केवळ १९.१३ टक्के खातेदारांनी ई-पीक पाहणी केली आहे. त्यात महाबळेश्‍वर तालुका अव्वल असून, या तालुक्यातील सहा हजार ५६६ पैकी चार हजार ६४९ म्हणजे ७०.८० टक्के खातेदारांनी, तर सर्वात कमी पाटण तालुक्यातील एक लाख ५७ हजार ५५१ पैकी केवळ १२ हजार ६८४ म्हणजे ८.०५ टक्के खातेदारांनी ई-पीक पाहणी केली आहे.

 e-crop
कोरेगाव भीमा प्रकरणावर नवीन पुस्तक;पाहा व्हिडिओ

ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे परंपरागत पद्धतीने तलाठी स्तरावरील पीक पाहणीतील त्रुटी आणि अपूर्तता अथवा तक्रारी विचारात घेऊन आता शेतकऱ्याला स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांचे फोटो काढून पीक पाहणी अपलोड करण्याचे स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका मोबाईलवरून २० खातेदारांची पीक पाहणी अपलोड करावयाची सोय असल्याने एका वस्ती/वाडीवर काही शेतकरी बांधवांकडे स्मार्ट फोन असला तरी ई-पीक पाहणी १०० टक्के होण्यास काहीही अडचण येणार नाही. ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप वापरण्यास अत्यंत सोपे असून, त्यासाठी सर्व खातेदार शेतकऱ्यांना गावचे तलाठी व कृषी सहायकांमार्फत मार्गदर्शन केले जाते.

 e-crop
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा एकमेकांशी संबंध नाही, हायकोर्टात दावा

खरीप हंगाम ई-पीक पाहणी करण्यासाठीची १५ सप्टेंबर ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे आणि त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत तलाठी स्तरावरून पीक पाहणी करण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. ई-पीक पाहणी शेतकरी करू न शकल्यास पीक कर्ज पीक विमा किंवा अन्य शासकीय योजना यांचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय अद्याप शासनाने घेतलेला नाही. मात्र, ई- पीक पाहणीमुळे पीक विमा, पीक कर्ज, तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभ होणार हे मात्र नक्की. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आता सर्वच योजनांसाठी जसे प्रधानमंत्री पीक विमा योजना, आधारभूत किमतीवरील धान/पीक खरेदी, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई, पीक कर्जासाठी बँक पोर्टल, महाडीबीटी पोर्टल इत्यादीमुळे सातबाऱ्यावर अचूक पीक पेरा नमूद असणे शेतकरी बांधवांच्या हिताचे आहे. ई- पीक पाहणी मोबाईल ॲपमधील बहुसंख्य त्रुटीही दूर करण्यात आल्या असून, खातेदारांनी लवकरात लवकर ई- पीक पाहणी करावी, असे आवाहन शासन स्तरावरून करण्यात आले आहे.

 e-crop
कोरेगाव तालुक्यात चोरट्यांचा धूडगूस; दागिने लुटले

जिल्ह्यातील तालुकानिहाय ई-पीक पाहणी

.........................

तालुका एकूण खातेदार नोंदणी झालेले खातेदार टक्केवारी

- कऱ्हाड १,४७,८५५ ३०, ६१८ २०.७१

- कोरेगाव ४२,३३२ १३,०५५ ३०.८४

- खंडाळा ५५,९७१ ८,०४० १४.३४

- खटाव ४१,४३० १०,५८५ २५.५५

- जावळी ४१,३९८ ११,४४० २७.६३

- पाटण १,५७,५५१ १२,६८४ ८.०५

- फलटण ५५,१०६ ११,७९० २१.४०

- महाबळेश्‍वर ६,५६६ ४,६४९ ७०.८०

- माण ५३,८५७ ६,७७४ १२.५८

- वाई २९,१८० ५,८९० २०.१९

- सातारा १,१३,६९६ २६,९८७ २३.७४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com