esakal | कोरेगाव तालुक्यात चोरट्यांचा धूडगूस; दागिने लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

कोरेगाव तालुक्यात चोरट्यांचा धूडगूस; दागिने लुटले

sakal_logo
By
अतुल वाघ

वाठार स्टेशन (जि. सातारा) : देऊर (ता. कोरेगाव) येथे साेमवारी (ता. १४) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी (theft) घरात प्रवेश करून तीन लाख ९० हजार रुपयाच्या किमतीचे सोन्याचे दागिने (gold ornaments) लंपास केले. वाठार पोलिस ठाण्यातून (wathar police station) मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कदम (फिर्यादी) व त्यांच्या नातेवाईक हे घरामध्ये आंबे पिकायला घालून रात्रीच्या दीडच्या सुमारास घराच्या पाठीमागील दरवाजाला कडी न लावताच झोपी गेले. (satara-marathi-news-three-lakhs-stolen-wathar-station-crime)

त्यानंतर चोरट्यांनी मागील दाराने घरात प्रवेश करून तीन पदरी गंठण, पट्टीचे झुमके, साखळी, कानातील फुले, कर्णफुले, अंगठी आदी सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे तपास करीत आहेत.

हेही वाचा: 169 रुपयांत देशभर Unlimited बाेला, राेज मिळवा दाेन जीबी डाटा

गळ्यास सुरा लावून महिलेचे दागिने लुटले

वाठार स्टेशनला घरात घुसून फिल्मी स्टाईलप्रमाणे दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्याला सुरा लावून एक लाख ८१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करून मोटारसायकलवरून पळ काढला. साेमवारी दुपारी चार वाजता ही घटना घडल्याने वाठारमध्ये खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले.

याबाबत वाठार पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशनमधील वाग्देव चौकात रेखा चंद्रकांत देवकाते (मूळ गाव नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या मुलीसह राहात आहेत. साेमवारी दुपारी चार वाजता त्यांच्या घरात दोन चोरटे घुसले. त्यांनी रेखा व मुलीच्या गळ्याला सुरा लावत जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा: हताश झालो, डगमगलो नाही; ऑलिंपिकला देशाचा झेंडा फडकविणारच!

सुऱ्याचा धाक दाखवत चोरट्यांनी रेखा यांच्या अंगावरचे व कपाटातील दोन तोळे सोन्याचे गंठण, कानातील बाळ्या, चमकी, कर्णफुले, एक तोळ्याची बदामाची चेन असे दागिने लुटले. लुटीनंतर घराबाहेर पडत चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. याची फिर्याद रेखा देवकाते यांनी वाठार पोलिस ठाण्याला दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

loading image