
Satara District Judge Removed from Post Following Departmental Inquiry
sakal
सातारा : जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले असून, त्यांना तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्यास सांगण्यात आले आहे. उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून त्यांची चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.