कोरोना निवारणावर साता-यात साडेचार कोटी खर्च

कोरोना निवारणावर साता-यात साडेचार कोटी खर्च

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. आता निधीची कमतरता भासू लागली आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने साडेचार कोटी रुपये कोरोना निवारणावर खर्च केला आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च हा जिल्हा रुग्णालयात चाचणी, उपचार, औषधे उपलब्ध करण्यावर झाला आहे. यातील एक कोटी 86 लाख रुपये लॅब व टेस्ट किटसाठीच्या खर्चाचा समावेश आहे. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला डिजिटल थर्मामीटर, ऑक्‍सिमीटर व इतर सुरक्षा साधनांवर 50 लाख रुपये खर्च झाला आहे. 

मार्च महिन्यांत कोरोनाचा पहिला रुग्ण जिल्ह्यात सापडला, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरवात केली. सुरवातीला रुग्णसंख्या कमी असल्याने कोविडचे गांभीर्य वाटत नव्हते. आता 35 हजारांवर रुग्णसंख्या गेल्यामुळे जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. त्यासाठी 89 कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. पण, आतापर्यंत कोरोना निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने साडेचार कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सर्वाधिक खर्च चाचणी लॅब उभारणे, किट उपलब्ध करणे, पुण्यातील लॅबला नमुने तपासणीसाठी लागणारा खर्चही देण्यात आला आहे. कोरोना उपचाराचा केंद्रबिंदू जिल्हा रुग्णालय ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना येथेच उपचार करावे लागत होते. त्यानंतर कऱ्हाडसह सर्व तालुक्‍यांमध्ये कोविड सेंटर उभारली गेली. तीही कमी पडू लागल्याने खासगी रुग्णालयेही अधिगृृहित केली.

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफीत साताऱ्यातील फिल्मला नॉमिनेशन
 
जिल्हा रुग्णालयात यंत्रणा उभारण्यासाठी एक कोटी 86 लाख रुपये देण्यात आले आहेत. यातून जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णालय तयार करणे, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड तसेच सर्वसाधारण बेड उपलब्ध करणे. तसेच चाचणी लॅबमध्ये ऍन्टीजेन टेस्टसाठी 24 लाख रुपये तर आरटीपीसीआर चाचणीसाठी लॅब उभारण्यासाठी एक कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता प्रत्येक तालुक्‍यात कोरोना सेंटर, काशीळ व साताऱ्यातील जम्बो हॉस्पिटलसाठी लागणारा जादा निधी शासनाकडून घेण्यात येणार आहे.

सन्मान भारताचा! युरोपियन कमिशनकडून डॉ. थोरातांना ग्रँड प्रिक्स प्राईज!

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 50 लाख रुपये उपलब्ध केले आहेत. यातून कोरोनाबाधितांचा सर्व्हे करणे, डिजिटल थर्मामीटर, ऑक्‍सिमीटरसह सुरक्षा साधनांवर खर्च करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्‍यात तहसीलदारांना विलगीकरण कक्ष करण्यासाठीही स्वतंत्र निधी उपलब्ध केला आहे. यामध्ये कोविड रुग्ण शोधून त्यांना क्वारंटाइन करणे, त्यांची राहण्याची व्यवस्था करणे, जेवण व इतर औषधोपचारांचा यामध्ये समावेश आहे.

कऱ्हाडकरांना आता रोज मिळणार जादा तीन लाख लिटर पाणी

जीवरक्षक इंजेक्‍शन्ससाठी हवा निधी 

कोरोनासाठी जिल्हा प्रशासनासोबत जिल्हा नियोजन समिती, राष्ट्रीय आरोग्य मिशन, राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी आदीतूनही कोरोना निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी निधी खर्च करण्यात आला आहे. आता वाढती रुग्णसंख्या आणि लागणाऱ्या जीवरक्षक इंजेक्‍शन्ससाठी आणखी निधी आवश्‍यक आहे. हा निधी आता राज्य शासनाकडून घेऊन त्यातून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com