Satara : ‘इको सेव्ह’विरोधात स्थानिक आक्रमक

काळ्या यादीत टाका, बिल रोखावे; ठेकेदारांचे कारवाईकडे लक्ष
Satara Municipality
Satara Municipalityesakal

सातारा : सोनगाव येथील कचरा डेपोत घनकचरा व्‍यवस्‍थापनाचे काम न करता पळ काढणाऱ्या इको सेव्‍ह लॅबच्‍या विरोधात स्‍थानिक ठेकेदार आक्रमक झाले आहेत. संबंधित कंपनीस काळ्या यादीत टाकण्‍यासह त्‍यांच्‍या कामाचे बिल रोखण्‍याची मागणी स्‍थानिक ठेकेदारांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. या मागणीनुसार पालिका प्रशासन आगामी काळात काय कारवाई करणार? याकडे स्‍थानिक ठेकेदारांचे लक्ष आहे.

शहरासह विस्तारित भागातील कचरा गोळा केल्‍यानंतर त्‍याच्‍यावर सोनगाव येथील कचरा डेपोत प्रक्रिया केली जाते. यासाठीचा ठेका

पालिकेने इंदूर येथील इको सेव्‍ह लॅब या कंपनीस दिला होता. तांत्रिक त्रुटी, प्रशासकीय विसंवादामुळे त्‍या कंपनीने हे काम अर्धवट सोडून पळ काढला. यानंतर पालिकेने हे काम पुणे येथील शिवसाई एंटरप्रायझेस या कंपनीस दिले.

या कंपनीच्‍या माध्‍यमातून सध्‍या कचऱ्यातून भंगार गोळा करण्‍याचे काम सुरू आहे. काळ्या यादीत न टाकता इको सेव्‍हने सुचविलेल्‍या कंपनीस काम करण्‍याचा ठेका देण्‍यात आला. या प्रक्रियेला स्‍थानिकांनी विरोध दर्शवला आहे.

इको सेव्‍ह या कंपनीला आवश्‍‍यक असणारी स्‍थानिक यंत्रणा साताऱ्यातील करंजे येथे राहणाऱ्या राजेंद्र कुंभार यांनी पुरवली होती. या पोटी त्‍यांना इको सेव्‍हकडून सुमारे १३ लाख रुपये येणे बाकी आहे. ही रक्कम पालिका व इको सेव्‍हच्‍या साठमारीत अडकून पडली आहे.

ती मिळण्‍यासाठी कुंभार यांचा पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. या अनुषंगाने श्री. कुंभार यांनी इको सेव्‍हला काळ्या यादीत टाकण्‍याची, तसेच त्‍यांचे बिल काढण्यापूर्वी स्‍थानिक ठेकेदार, पुरवठादारांचे लेखी, तोंडी म्‍हणणे विचारात घेण्‍याची मागणी करणारे पत्र पालिका प्रशासनास दिले आहे.

चर्चेत तथ्य?

कचरा डेपो, त्‍याठिकाणची कार्यपद्धती आणि त्‍यातील अर्थकारणाविषयी खुलेआम पालिकेच्‍या सभागृहात यापूर्वी अनेकदा चर्चा झाली होती. या चर्चेत तथ्‍य असल्‍याचे प्रशासकीय अनागोंदी कारभारामुळे स्‍पष्‍ट होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com