.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सातारा: प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने ५८१ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू केली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांत ५१ शिक्षकांच्या कागदपत्रांमध्ये गैरप्रकार आढळल्याने त्यांना निलंबनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.