Satara: आगामी निवडणुकांत शिवसेना स्वतंत्र लढेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभूराज देसाई

सातारा : आगामी निवडणुकांत शिवसेना स्वतंत्र लढेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्याप्रमाणे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे प्रतिबिंब दिसावे, अशी शिवसेनेची मागणी होती. पण, ऐनवेळी काय झाले, तेच कळाले नाही. यापुढे शिवसेनेलाही स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल आणि आम्ही ती निश्चित घेऊ, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक अशा सहकार पॅनेलमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना सामावून घेतले जाणार, अशी चर्चा होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जिल्ह्यातील नेत्यांना तशी सूचना करून मंत्री देसाई यांना यावेळेस सामावून घ्या, अशी सूचना केली होती. पण, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेत महाविकासचा फॉर्म्युला न राबवता थेट भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन तब्बल ११ जागा बिनविरोध केल्या. त्यामुळे काँग्रेस, शिवसेनेला जिल्हा बँकेपासून दूर ठेवले आहे. त्यावरून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई संतप्त झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘सर्वसमावेशक पॅनेलमध्ये मला डावलण्याचा हा विषय नाही. जसे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे, तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रतिबंब दिसावे, अशी शिवसेनेने मागणी केली होती. तसे संकेत राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते. पण, ऐनवेळी काय झाले, आम्हाला माहीत नाही. त्यामुळे यापुढे शिवसेनेला स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल, ती आम्ही निश्चित घेऊ.’’

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘आगामी काळातील सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र पद्धतीने लढेल. त्याबाबतचे धोरण ठरविले जाईल. जिल्हा बॅंकेची आता निवडणूक होत असली तरी ते निमित्त आहे. जिंकण्यासाठीच शिवसेना लढेल. परंतु, यापुढे शिवसेना निश्चित धोरण ठरवत वाटचाल करेल. आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यापुढे काय पावले उचलणार, याची उत्सुकता आहे.

आपले बहुमत आहे. आपल्याबरोबरच जास्त मतदार आहेत. त्यामुळे असा एकतर्फी निर्णय जर कोणता पक्ष घेणार असेल तर आम्हालादेखील आमचा मार्ग मोकळा आहे.

- शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

loading image
go to top