Satara: कोरेगावात मतदार यादीवर आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार यादीवर आक्षेप
कोरेगाव मतदार यादीवर आक्षेप

सातारा : कोरेगावात मतदार यादीवर आक्षेप

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी चुकीच्या कार्यपद्धतीने तांत्रिक दोषासह प्रसिद्ध करण्यावर हरकत असल्याबाबतचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख अक्षय बर्गे यांनी प्रांताधिकारी तथा कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले असून, तब्बल एक हजार २० एवढ्या मतदारांना प्रत्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा आरोप श्री. बर्गे यांनी या निवेदनात केला आहे.

यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे, की कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीकरिता गेल्या २६ तारखेला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर २७ ते २९ तारखेपर्यंतच्या मुदतीत अनेक हरकती प्राप्त झाल्या. या हरकतींबाबत सुनावणी होऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करणे अपेक्षित असताना अशा पद्धतीची कोणतीही कार्यवाही केली नाही. कार्यालयात बसून ठराविक अर्जांच्या हरकती मान्य केल्या आहेत. उर्वरित सर्व हरकती संबंधित अर्जदारांना सूचित न करता निकाली काढल्या आहेत.

हेही वाचा: SRH Player Retention : ऑरेंज आर्मीचा जम्मूच्या पोरांवर विश्वास

सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या जवळचे नातेवाईक तसेच मर्जीतील विद्यमान नगरसेवक असलेल्या अर्जदारांच्याच हरकती मान्य केल्या आहेत. हरकतींची सुनावणी होऊन स्थळपाहणी केल्यानंतर सर्व खातरजमा करून जबाबदार अधिकारी या नात्याने अंतिम मतदार यादी सार्वजनिक प्रसिद्धीस देणे अपेक्षित आहे. मात्र, अशा प्रकारे कायदेशीर कार्यवाही केली नाही. ही बाब गंभीर असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर शंका निर्माण होत आहे.

तसेच निवडणूक आयोगाच्या एक नोव्हेंबर २०२१ रोजीच्या प्रसिद्धीनुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील यादी भाग क्रमांक २१४ ते २३५ मधील एकूण मतदारसंख्या २० हजार १८८ एवढी आहे. मात्र, कोरेगाव नगरपंचायतीच्या २०२१ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीतील प्रभाग क्रमांक एक ते १७ मधील मतदारांची एकूण संख्या १९ हजार १६८ एवढी आहे.

हेही वाचा: CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

म्हणजे तब्बल एक हजार २० एवढ्या मतदारांना प्रत्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. अंतिम मतदार यादी पाहता अनेक बोगस नावे हितसंबंध जोपासण्यासाठी समाविष्ट केल्याचे दिसून येत आहे. एका मतदाराचे नाव प्रत्यक्ष राहत्या घराखेरीज अन्य दोन ते तीन प्रभागांत दाखल केल्याचे दिसून येत आहे. कोणतीही खातरजमा न करता तब्बल एक हजार २० मतदारांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवणाऱ्या बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे श्री. बर्गे यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
----

Web Title: Satara Election Voter List Fraud

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sataravoter list