

Maharashtra Farmer Loan Waiver Satara District Announces Fourth List 34581 Farmers Become Eligible for Fresh Crop Loans
sakal
सातारा : अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील एकूण ५१ हजार ४५३ कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली असून, त्यापैकी ४१ हजार ५२६ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी ३६ हजार ४३१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) पूर्ण केली आहे. आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना २५२.८८ कोटी इतक्या रकमेचा लाभ प्राप्त झाला आहे.