Satara: शेतकरी नवराच हवा ! तिने पुरा केला हट्ट, ट्रॅक्टरमध्ये नवरानवरी

सातारा तालुक्याच्या परळी परिसरातील काळोशी (ता. सातारा) येथे नुकताच हा आगळा विवाह सोहळा संपन्न झाला.
satara
satarasakal

सुनील शेडगे : सकाळ वृत्तसेवा

नागठाणे - सरकारी नोकरीतील पगारदार नवरा, गाडी, बंगला हे तर बहुतेक साऱ्याच नवरी मुलींचे स्वप्न. इथे मात्र ‘शेतकरी नवरा हवा मला’ हा हट्ट तिने धरला अन् तो पुराही केला. त्यातून समाजाला एका अनोख्या विवाहाची प्रचिती लाभली.

सातारा तालुक्याच्या परळी परिसरातील काळोशी (ता. सातारा) येथे नुकताच हा आगळा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यात गावातील हभप जनार्दन निकम यांचे पुतणे, तसेच तानाजी निकम यांचे चिरंजीव अविनाश अन् सुप्रिया हे विवाहबद्ध झाले. सुप्रिया ही कुरुण गावातील शेतकरी सदाशिव जाधव यांची कन्या. उच्चशिक्षित असूनही नोकरदार स्थळाऐवजी तिने शेतकरी जोडीदाराला पसंती दिली.

satara
Mumbai : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

त्यामुळे हा विवाह सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. त्यापुढे जात सोहळ्यात विवाहाच्या क्षणी धरलेला ‘शेतकरी नवराच हवा’चा अंतरपाट उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. त्यावरील ‘कशाला हवा ध्यास नोकरीचा, अभिमान बळिराजाच्या भाकरीचा’ हा संदेश उपस्थित सर्वांसाठी प्रबोधनात्मक ठरला.

फेट्यातील रुबाबदार शेतकरी अन् त्याची आधुनिक काळातील कारभारीणही तितकाच कौतुकाचा विषय ठरली. या सोहळ्यास परिसरातील मान्यवर, तसेच दोन्ही परिवारांतील नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.

विवाहाच्या घटिकेला हे वधू- वर सजविलेल्या ट्रॅक्टरमधून मंडपात दाखल झाले. या ट्रॅक्टरचे सारथ्य स्वतः वराने केले. त्यावर दर्शनी भागात लावलेला ‘शेतकरी नवरा हवा’ हा फलकही नवविचारांची पेरणी करणारा ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com