दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 'किसान'चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

गिरीश चव्हाण
Sunday, 17 January 2021

दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज साताऱ्यात राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सातारा : दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सातारा येथे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मोर्चा काढून त्यातील सहभागींनी मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले. 

केंद्राने तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 50 दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि शेतकरी संघटनांच्यात चर्चेच्या नऊ फेऱ्या पार पडल्या. मात्र, तोडगा निघाला नाही. 

राष्ट्रीय सुरक्षेची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली?; अर्णब गोस्वामीप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला खडा सवाल

दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सातारा येथे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्रदीप बोराटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोर्चाने दाखल झाले. कृषी कायदे रद्द करण्याची, निवडणुकीतील ईव्हीएम मशिनचा वापर बंद करण्याची मागणी करणारे निवेदन आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. 

Good News : बहुचर्चित फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु; रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Farmers Protest News National Kisan Morcha Agitation At Satara